आर्थिक गणनेच्या राष्ट्रीय कामासाठी प्रगणकांना सहकार्य करावे - जिल्हाधिकारी पुणे : ७ व्या आर्थिक गणनेच्या राष्ट्रीय कामासाठी आपणाकडे येणा-या प्रगणकाना निःसंकोचपणे सर्व माहिती देऊन नागरीकांनी सहकार्य करावे असे आवाहन अध्यक्ष, जिल्हास्तरीय समन्वय समिती, ७ वी आर्थिक गणना, पुणे तथा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे. केंद्र शासनाचे सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय (एमओएसपीआय) मार्फत देशभरात ७ वी आर्थिक करणेत येत आहे.आर्थिक गणनेमध्ये देशाच्या भौगोलिक सीमांतर्गत वस्तू व सेवांचे उत्पादन ब वितरण करणा-या हारगुती उघोगा सहित सर्व सूक्ष्म , लघु, मध्यम व मोठया आस्थापनांची अधिकृतपणे गणना केली जाते. आंतर राष्ट्रीय मानकांनुसार राष्ट्रीय व्यवसाय नोंदवही (बिझनेस रजिस्टर) तयार करणे; बिगर कृषी उद्योगात कार्यरत सर्व नोदणीकृत व अनोंदणीकृत, असंघटीत आस्थापनांच्या- सर्व आर्थिक बाबींची विविध स्तरांवरील (देश राज्य,जिल्हा ,तालुका,गाव .) सविस्तर माहिती गोळा करणे, कार्य व क्षेत्रनिल व कार्यरत आस्थापनांमधील कामगारांच्या संख्येबाबतची आकडेवारी उपलका करून देणे, व सर्व कार्यरत आस्थापनांचे भौगोलिक स्थान जाजून (जीओ टॅगिंग) यादी तयार करणे ही या आर्थिक गणनेची प्रमुख उदिदष्टये आहेत. केंद्र शासना मार्फत ७ वी आर्थिक गणना करणेकरिता अंमलबजावणी यंत्रणा म्हणून सामाईक सेवा केंद्र (कॉमन सर्हिस सेंटर) यांची नियुक्ती करणेत आलेली असून त्यांनी नियुक्त केलेल्या प्रगणकांकडून प्रत्यक्ष माहिती संकलित केली जाणार आहे. गणनेची प्रभावी अंमलबजावणी, संनियंत्रण व समन्वय करणेसाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समन्वय समिती (जिस्ट्रीक्ट लेहल कोऑर्डिनेशन कमिटी) गठीत करणेत आलेली आहे. राज्यात या गणनेची सुरुवात दि. २६ नान्हेंबर, २०१९ पासून केली जाणार असून ३ महिन्यांच्या कालावधीत गणनेचे काम पूर्ण करावयाचे आहे. या गणनअंतर्गत सीएससी प्रगणकांमार्फत हाराहारी व उद्योजकांकडे प्रत्यक्ष भेट देऊन कुटूंव, उद्योग, वपसाव व सेवा यांची माहिती संकलित केली जाणार आहे७ व्या आर्थिक गणनेत संकलित करण्यात येणारी माहितीही गोपनीय राहणार असून या माहितीचा उपयोग केवळ स्थानिक जिल्ला. रा. देशपातळीवरील नियोजनासाठी केला जाणार आहे.
आर्थिक गणनेच्या राष्ट्रीय कामासाठी प्रगणकांना सहकार्य करावे - जिल्हाधिकारी