लातूर: राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली व माहराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण,उच्च न्यायालय, मुंबई यांचे निर्देशानुसार जिल्हा न्यायालय, लातूर येथे राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात येणार आहे. राष्ट्रीय लोकन्यायालय राष्ट्रीय लोकन्यायालयाचे पुढील तारखेस आयोजन करण्यात येणार आहे. दिनांक ८ फेब्रुवारी २०२०, ११ एप्रिल २०२०, ११ जुलै २०२०, १२ सप्टेंबर २०२० व १२ डिसेंबर २०२० रोजी राहील.वरील तारखेस जिल्हा न्यायालय, लातूर येथे राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात येणार आहे. सदरील लोकन्यायालयामध्ये एन.आय क्ट सेक्शन १३८, पैसे वसूलीची प्रकरणे, कामगार वाद प्रकरणे,वीज व पाणी बील, देखभाल प्रकरणे, दिवाणी, फौजदारी वाद, मोटार अपघात दावा प्रकरणे इ. न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत. लोकन्यायालयाचे आयोजन. जनतेस आवाहन करण्यात येते की, त्यांचे न्यायालयात प्रलंबित असलेले प्रकरण वरील तारखेस आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये ठेवून मिटविण्यात यावीत असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
जिल्हा न्यायालय, लातूर येथे राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन.